माय मराठी संस्था शिक्षण क्षेत्रात खालील प्रमाणे
कार्य करित आहे. हे कार्यक्रम संस्थेच्या शिक्षण विभागामार्फत
चालविले जातात.
१) गरीब विद्यार्थांकरिता शिक्षण प्रायोजित करणे.
विद्यार्थांचे संपूर्ण वर्षाचे शिक्षण संस्थेतर्फे प्रायोजित केले
जाते, या मध्ये संपूर्ण वर्षाची शाळेची फी, वह्या, पुस्तके, गणवेश
आदीचा खर्च संस्थेतर्फे दिला जातो. (संपर्कसुत्र - सीमा शेलार :
९८२०९५८३६४)
२) विद्यार्थी दत्तक योजना : संस्थेमार्फत
विद्यार्थी दत्तक योजना चालविली जाते, या अंतर्गत तुम्ही रु ३५००/-
भरुन एका विद्यार्थ्याचे शिक्षण प्रायोजित करु शकता. संस्था
विद्यार्थी, पालक व तुमच्यात दुव्याचे काम करते. (संपर्कसुत्र -
सीमा शेलार : ९८२०९५८३६४)
३) आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक कार्य :
कसारानजीकच्या उमरमाळी येथे संस्था आदिवासी पाड्यांमध्ये अनेक
उपक्रम राबवित आहे. यात विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक वाटप, कपडे
वाटप प्रामुख्याने केले जाते. २०१०-११ या शैक्षणिक वर्षात संस्थेने
उमरमाळी येथे विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सोय उपलब्ध करुन दिले.
या वाचनालयात मुलांकरिता ४०० पुस्तकांची सोय करण्यात आली आहे.
(संपर्कसुत्र - सीमा शेलार : ९८२०९५८३६४)
४) व्यवसाय मार्गदर्शन शिबिर : विद्यर्थ्यांना
त्यांच्या भविष्याची गति निर्धारित करण्यासाच्या उद्देश्याने
संस्था व्यवसाय मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करते. (संपर्कसुत्र -
सीमा शेलार : ९८२०९५८३६४)
|
| |
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|