|
माय मराठी संस्थेच्या संकेतस्थळावर
आपले हार्दिक स्वागत आहे. माय मराठी एक विचार आहे, एक चळवळ
आहे. जगभर विखुरलेल्या मराठी जनतेस एका उद्देश्याने एकत्र
करुन समाजोपयोगी कार्यक्रम राबवून मराठी समाजास आपल्या
परीने मदत करावी या उदात्त व विधायक ध्येयाने झापाटलेल्या
विचाराचे नाव माय मराठी संस्था. केवळ चार युवकांनी सुरु
केलेल्या या चळवळीचे आज रुपांतर एका संस्थेत झाले असुन आज
या संस्थेचा पसारा सर्वत्र वाढलेला आहे.
|
| |
|
माय मराठी संस्था
ही एक अराजकीय संस्था आहे, कुठल्याही राजकीय
विचारसरणीशी संस्थेचा संबंध नाही आहे.
माय मराठी चळवळीचे ध्येय अगदी सोपे
आहे. मराठी समाज हा सुशिक्षित, गुणवंत व सॄजनशील आहे,
मात्र हा समाज विखुरलेला आहे, जाती भेद, प्रांतभेद आदी
बाबींमुळे मराठी समाजाची शक्ती व्यय होत आहे. या त्रुटींबर
मात करुन मराठी लोकांचे एक जाळे विणुन या समाजातील शक्ती
याच समाजाच्या हिताकरिता व पर्यायाने देशाच्या हिताकरिता
वापरण्याचे ध्येय संस्थेचे आहे. संस्थेच्या कार्यक्रमास
आपला पाठिंबा अपेक्षित असुन आपणही या मोहिमेत सहभागी
व्हावे हे आवाहन. |
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|