भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
इंग्रजी
लेखन / संभाषण व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम
लिंक्स
मराठी माध्यमांच्या शाळांमधील
विद्यार्थांमध्ये इंग्रजी भाषे
विषय एक अनाहुत भीती असते,
त्याचेमुळे शालांत परीक्षा
उत्तीर्ण झाल्यावर
महाविद्यालयात विशेषतः अकरावी व
बारावीत या विद्यार्थांच्या
गुणांमध्ये घसरण होते. यावर मात
करण्याकरिता संस्था मराठी
माध्यमांच्या शाळांमध्ये
इंग्रजी लेखन व संभाषण वर्ग
आयोजित करिते. याचाच एक भाग
म्हणुन संस्थेने ग्रँट रोड व
मालाड येथील शाळांमध्ये २००९ च्या
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये २०
दिवसांचा मोफत सराव वर्ग राबविला.
इंग्रजी लिखान, व्याकरण व
संभाषण यावर भर दिला गेला. .
सुनदत्ता विद्यालय ग्रँट रोड व
दयानंद विद्यालय मालाड येथील
कार्यक्रम
दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २००९
पर्यंत ग्रँट रोड येथील
सुनदत्ता उच्च माध्यमिक विद्यालय
व दयानंद विद्यालय, मालाड येथील
५० विद्यार्थांकरिता इंग्रजी
लिखाण व संभाषण वर्ग आयोजित केले
गेले होते. या कार्यक्रमाच्या
शेवटच्या दिवशी विद्यार्थांना
प्रमाण पत्र देण्यात आले. दि. ३०
एप्रिल २००९ रोजी या शाळेतील
विद्यार्थांकरिता व्यवसाय
मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन
केले गेले, या कार्यक्रमात श्री
सुहास कदम यांचे
मार्गदर्शन लाभले, तसेस श्री
प्रथमेश कदम, उप-संपादक, दैनिक
प्रहार, यांचे हस्ते प्रमाणपत्रे
वितरण झाली.