A Registered NGO under Indian Societies Act 1860 & Indian Public Trust Act 1950


कांदिवली येथे महिला बचत गटांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियान
 

माय मराठी संस्थेने दिनांक १० जानेवारी २०१० रोजी कांदिवली येथे महिला बचत गटांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित केले होते. या कार्यक्रमात विविध बचत गटांमधील ३० महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमा मध्ये महिलांना बचत गट कसा चालवावा, बचत गटांचे रुपांतर लघु उद्योगांमध्ये कसे करावे, विविध शासकीय योजना, कर्ज योजना आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री समीर मंचेकर यांनी केले, तर सुरुवातीस श्री अवधूत कामत, उपाध्यक्ष यांनी माय मराठी बद्दल माहिती दिली. श्री विजय जोशी यांनी उपस्थितांना स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन केले, श्री प्रकाश मोहिते यांनी महिलांना उद्योजकते कडे वळण्याचे आवाहन केले  कार्यक्रमा नंतर २५ महिलांनी सखोल प्रशिक्षणासाठी आपली नावं नोंदविली.

या कार्यक्रमात कु अंजली वाडेकर, सौ मैत्रेयी, श्री अतुल पिसाळ, श्री भरत कोरडे, श्री सागर रांजणकर, श्री दत्ताराम वाळवणकर, श्री नितेश महाडिक, श्री अजय देवरुखकर आदींची उपस्थिती लाभली.

 
Photo Gallery
 
   
..Subscribe emasik
Jobs
Business Forum
Our Yahoo Group
Orkut Community
Our Blog
SMS Channel
Marathi Forum