माय मराठी संस्था, मुंबईने दिनांक
०६ मार्च २०१० रोजी खानव गाव,
मोर्बे, तालुका पनवेल येथे
बचतगटांमधील महिलांकरिता
उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित
केले होते.
या अभियानात ३० महिलांचा सहभाग
होता, महिलांना बचत गट कसा
चालवावा, बचत गटांच्या माध्यमातुन
व्यवसाय कसा करावा, विविध
स्वयंरोजगाराच्या योजना आदि
विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
आगामी कालावधीत या महिलांना
उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमात
सहभागी करुन घेण्याचा संस्थेचा
विचार आहे.