भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


.आमचे ध्येय लिंक्स  

आमचे ध्येय अगदी सोप आहे, दिशा निश्चित आहे.

मराठी समाजास प्रगतीच्या एकाच ध्येयाने एकवटून एक विधायक चळवळ सुरु करण्याचे आमचे स्वप्न आहे. मराठी समाज हा सुसंस्कॄत आहे, ब-यापैकी शिक्षित आहे, मात्र तो विखुरलेला आहे, जातीपातींच्या भिंती, प्रांतवाद, राजकीय व सामाजिक बांधिलकीमध्ये जखडून आहे, त्यामुळे मराठी समाजाची शक्ती व्यय होते. आजच्या स्पर्धात्मक युगात जो पर्यंत समाजात स्पर्धात्मकतेची भावना रुजलेलीनसेल तो पर्यंत समाज प्रगतीशील होऊ शकणार नाही. जो पर्यंत समाज प्रगतीशील नसेल तो पर्यंत त्याच्या कडे आर्थिकशक्ती येत नाही, आर्थकारणाशिवाय कोणत्याही समाजास आज मान मिळत नाही. माय मराठी इतर कोणत्याही समाजास विरोध करित नसुन केवळ आपल्या समाजाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करुन तो कसा पुढे जाईल यावर संस्थेचा भर राहिल. शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसाय,महिला सशक्तिकरण, माहिती प्रसारण आदी विषय संस्था हाताळणार असुन, संस्थेचा प्रत्येक सदस्य त्याच्या किंवा तिच्या कडील असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजहिता करिता करेल. अशाप्रकारे मराठी माणसांची एक स्वयंपुर्ण व स्वयंसेवी साखळी करुन पुर्ण समाजाचे हित जपण्याचा संस्थेचा मानस आहे.

...
   
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ