|
माय मराठी संस्थेने ताडदेव येथे दिनांक ०८/०३/२००९ रोजी बचत
गटांमध्ये काम करणा-या महिलांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियान
राबविले. बचतगटांमध्ये काम करणा-या महिलांना एकत्र करुन
त्यांना काही स्वयंरोजगार सुरु करण्याची प्रेरणा देण्यासाठी या
कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमात महिलांना लघु उद्योग
कसा सुरु करावा, भांडवल उभारणी कशी करावी, कर्ज कसे मिळवावे,
शासकीय योजना काय आहेत या बाबत माहिती देण्यात आली होती. एकून ४७
महिलांनी या कार्यक्रमाचा फायदा घेतला. माय मराठी च्या प्रेरणेने
तेथे एक नवीन बचत गट निर्माण झाला, त्याचे नाव 'स्वराज' बचत गट असे
ठेवण्यात आले..
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|