|
दिनांक ०७
मार्च २०१० रोजी, येणा-या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन माय
मराठी संस्था व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वुमेन्स स्टडी सेंटरने
उल्हासनगरच्या सी.एच.एम. महाविद्यालय येथे महिलांकरिता एक दिवसीय
उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उल्हासनगरच्या महापौर राजश्री राजेंद्र
चौधरी यांनी केले. कार्यक्रमात वुमेन्स स्टडी सेंटरच्या संचालिका
एस. अशोकन व श्रीमती सोनिया वरधानी उपस्थित होत्या.
सुरुवातीस माय मराठी बद्दलची माहिती संस्थेच्या कोषाध्यक्षा सीमा
शेलार यांनी दिली, त्या नंतर राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय
कार्यकारिणी सदस्य श्री जीवराज सावंत यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन
केले
संस्थेचे अध्यक्ष श्री भुषण पैठणकर यांनी महिलांना स्वयंरोजगारित
होऊन स्वाभिमानाने आयुष्य जगण्याचे आवाहन केले...संस्थेचे
सचिव श्री विजय जोशी यांनी चलचित्राच्या माध्यमातुन स्वयंरोजगार
कसा करावा, येणा-या अडचणींवर मात कसे करावे इत्यादी विषयांवर
मार्गदर्शन केले. त्या उपरांत श्री प्रकाश मोहिते यांनी महिलांना
फिनायील, अगरबत्ती, परफ्यूम्स इत्यादी वस्तु बनविण्याचे
प्रात्यक्षिक दिले...कार्यक्राचे
सुत्र संचालन श्री समीर मंचेकर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या
आयोजनात विशेष सहकार्य सौ.समिधा कोरडे यांचे लाभले.
उपरोक्त
कार्यक्रमात महिलांना उद्योग कसा सुरु करावा, लागणारी कागदपत्रे,
विविध नियम, शासकीय योजना, कर्ज योजना आदी विषयांवर सखोल
मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच त्यांना काही व्यवसायांचे प्रशिक्षण
देण्यात येणार आहे.
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|